तुळजापूर (प्रतिनिधी) :- आम् संघर्ष टाईम्स online ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार पूर्ण केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी तर निर्मिती जेनेलिया देशमुख यांनी केली आहे. चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.
या वेळी मंदिर परिसरात भाविकांनी देशमुख दांपत्याचे स्वागत केले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.