“मृत्यूही तोडू शकला नाही नातं; आई-मुलगा शेवटपर्यंत मिठीत…”


“मृत्यूनंतरही ममता सुटली नाही…”
जबलपूर (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात झालेल्या क्रूज दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला असून, या दुर्दैवी घटनेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र या वेदनादायक प्रसंगातून एक अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, ज्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणले.
अपघातानंतर सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेदरम्यान रेस्क्यू टीमला आई आणि तिच्या लहान मुलाचे मृतदेह एकमेकांना घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले. हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. जणू शेवटच्या क्षणापर्यंत आईने आपल्या लेकराला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
या दृश्याने रेस्क्यू टीमच्याही भावना अनावर झाल्या. मृतदेह कफनात गुंडाळताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनीही शांतपणे हा प्रसंग पाहिला, मात्र त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, आईचं प्रेम हे जगण्यापेक्षाही मोठं असतं. मृत्यूच्याही पलीकडे जाऊन ते आपली छाया सोडत नाही.
ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून, अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराची वेदना ठरली आहे. काही प्रसंग हे केवळ बातम्या राहत नाहीत, तर ते कायमस्वरूपी मनात घर करून राहतात.

Post a Comment

Previous Post Next Post