देवकुरळी (प्रतिनिधी सुरज थोरात )– पंचशील तरुण मंडळ, देवकुरळी यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भगवान बुद्धांच्या विचारांचा व त्यांच्या पंचशील तत्त्वांचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले. त्यांनी अहिंसा, करुणा, समता आणि बंधुता या मूल्यांचा अवलंब करून समाजात शांतता व एकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी भाषणे, गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. तसेच समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष महादेव थोरात,उपाध्यक्ष धीरज थोरात, सचिव धनाजी तुळशे , राजेंद्र कुमार सुरवसे, सुरज थोरात, तुषार मस्के,महादेव हावळे,प्रमोद थोरात, मारुती थोरात, रमेश तुळशे, बुद्धम थोरात, श्रुतील थोरात, उपस्थित महिला रेश्मा थोरात, कविता थोरात, कविता तुळशे, सुनंदा मस्के,शिल्पा थोरात, ज्योती शिवशरण, सुनिता कांबळे, वनिता मोहिते, श्रेया थोरात, सरुबाई थोरात, जनाबाई थोरात, चांदन कांबळे,साळुबाई तुळशे, साखराबाई कांबळे, आशाबाई थोरात, लक्ष्मी थोरात, सारनाबाई थोरात, रूपाली थोरात, ताई बाई हावळे, अत्तु जाधव हे सर्वजन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पंचशील तरुण मंडळाच्या सदस्यांनी उत्कृष्टरीत्या केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून व खिर दान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags
जिल्हा धाराशिव