धाराशिवात भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या आवाजाने भारावले वातावरण


धाराशिव प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाने अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आणि हृदयस्पर्शी गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात सादर झालेल्या प्रत्येक भीमगीतामधून स्वाभिमानाची जाणीव, प्रेरणेचा संदेश आणि एकजुटीची भावना प्रभावीपणे व्यक्त झाली. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील जोश आणि भावनेने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
लेडीज क्लबच्या माध्यमातून धाराशिवकरांनी यापूर्वीही अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांचा अनुभव घेतला असला, तरी या सोहळ्याची खास ओळख म्हणजे डॉ. सौ. साक्षी आणि मल्हार पाटील यांचा उत्साही पुढाकार होय. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद ठरला.
प्रेक्षकांच्या प्रेम, पाठिंबा आणि उत्साहामुळे हा कार्यक्रम भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व धाराशिवकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post