वाडा / प्रतिनिधी :- अमीन मेमन
बकरी ईद सण शांतता व सलोख्याच्या वातावरणात पार पडावा यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडूस शहरात आज सायंकाळी पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश देण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मार्च काढण्यात आला असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी जव्हार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. मेहेर साहेब, वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. केंद्रे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.
बकरी ईद सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी शांतता व बंधुभाव कायम ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
Tags
जिल्हा पालघर