तुळजापूर :- (प्रतिनिधी) :- तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात काही वाहनधारकांकडून अनधिकृतपणे वाहन पार्किंग करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विश्रामगृह परिसरात नियमबाह्य पद्धतीने उभी करण्यात आलेली वाहने येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी अडचणीची ठरत आहेत.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विश्रामगृह परिसर हा शासकीय कामकाजासाठी राखीव असताना काही व्यक्तींकडून दीर्घकाळ वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अधिकृत वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. तसेच परिसरातील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार आहे.शासकीय मालमत्तेचा नियमबाह्य वापर थांबवून संबंधितांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरात सूचना फलक लावणे, अनधिकृत वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच नियमित पाहणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून शासकीय विश्रामगृह परिसर अनधिकृत पार्किंगमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Tags
तुळजापूर विशेष