कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा ढोकी येथे उत्साहात संपन्न
ढोकी, ता. कळंब (प्रतिनिधी) : परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोगाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा ढोकी येथे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आत्मसाक्षात्काराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मा. सौ. अश्विनीताई माळी (सरपंच, ढोकी), मा. अमोल समुद्रे (उपसरपंच), मा. अमर समुद्रे (पंचायत समिती सदस्य), मा. राहुल वाकुरे (पोलीस पाटील), मा. राजपाल गुणवंतराव देशमुख, मा. निहाल काझी (ग्रामपंचायत सदस्य), श्री. मोहन शिंदे, श्री. सुभाष जाधव (केज), श्री. अनिरुद्ध काळे, श्री. युवराज कोळी (मोहोळ), मुन्नाभाई बाबर (विटा, सांगली), डॉ. बाबासाहेब धावारे (मुरुड), श्री. उमेशजी लोगे (अहिल्यानगर), श्री. बी.एन. पाटील (मुंबई), श्री. विशाल पांडे (पाणीपुरवठा अधिकारी, मनपा पुणे), श्री. अमर कदम (लातूर), श्री. अंबादास दमकोंडवार (केज), श्री. दशरथ साबळे (पुणे), श्री. ज्ञानेश्वर शिंदे (अस्तगाव, शिर्डी), डॉ. सौजन्यानी यावारे (मुरुड), भा. सौ. सुरेखा साकुखे (मुख्याध्यापिका, तुळजापूर) तसेच दैनिक आम संघर्ष टाइम्सचे संपादक श्रीनिवास साळुंके-पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात श्री. विनायक ढवळे आणि डॉ. बाबासाहेब धावारे यांच्या हस्ते श्री माताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक श्री. राजेश मनुजा (मुंबई) यांनी केले.
यावेळी सहजयोगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार, मानसिक शांतता, आरोग्य, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास, विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि शेती क्षेत्रातील प्रगती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहजयोगामुळे मन व बुद्धीचे संतुलन साधले जाते, मानसिक तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सुख, शांती व समाधान प्राप्त होते, असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.
सहजयोग म्हणजे काय?
‘सह’ म्हणजे सोबत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेला. मानवासोबत जन्माला आलेल्या कुंडलिनी शक्तीचा आत्म्याशी योग घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे सहजयोग होय. मानव शरीरातील सात चक्रे, तीन नाड्या आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर डोक्याच्या टाळूवर व तळहातांवर थंडावा जाणवतो, यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.
सहजयोगाच्या संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया सर्वांसाठी सहज व सुलभ करून मानवजातीला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दिला आहे. आज जगातील १५० हून अधिक देशांमध्ये विविध धर्मांचे लोक सहजयोगाचा लाभ घेत आहेत.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना कुंडलिनी जागृतीचा अनुभव देण्यात आला. श्री. उमेशजी तोगे साहेब यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सहजयोगाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले असून शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंद, शांतता आणि अध्यात्मिक उर्जेच्या वातावरणात संपन्न झाला.
Tags
धाराशिव जिल्हा